खरंच इतिहासातून आपण काहीच शिकत नाही - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 3, 2021

खरंच इतिहासातून आपण काहीच शिकत नाही

लॉकडाऊन मध्ये दुसरं काहीच करता  येत नसल्याने फावल्या वेळेत यूट्यूब किंवा सिनेमा बघणे हाच एक टाईमपास उरतो. सर्फिंग करताना ‘Contagion’ नावाच्या २०११ सालच्या एका सिनेमाचा ट्रेलर पाहण्यात आला. त्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एका भयंकर वायरसमुळे संपूर्ण जगात अफरातफरी माजते अशी कथा दिसली, म्हणून मी तो सिनेमा पाहिला. २०११ सालीच ‘स्कॉट बर्न’ या लेखकाने एखाद्या भयानक वायरसमुळे संपूर्ण जगात कसा हाहाकार माजू शकतो आणि लोक कसे मृत्युमुखी पडू शकतात याची कल्पना करून या सिनेमाची कथा लिहिली आहे. स्टीव्हन सोडरबर्ग यांनीही सिनेमा उत्कृष्ठपणे दिग्दर्शित केला आहे. मॅट डॅमन, केट विन्सले, वीनेथ पॅल्ट्रो, जूड लॉ, लॉरेन्स फिशबर्न, मरियन कोटीलार्ड सारख्या उत्तम अभिनेत्यांनी सिनेमा जीवंत केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे डेडली वायरस, वॅक्सीन, लॉकडाऊन, क्वारंटाईन, सेफ डिस्टनसिंग, बॉडी बॅग्स हे शब्द या सिनेमातून ऐकायला मिळतात. सिनेमाने वायरसचा झपाट्याने होत जाणारा फैलाव, त्यामुळे होणारे मृत्यू, न्यूज आणि सोशल मीडियामधील बातम्यांचा गोंधळ, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ यांचे उत्कृष्ठ चित्रण दाखवले आहे, जे आपल्याला आज कोरोना काळात पाहायला मिळत आहेत. जवळपास १० वर्षं आधी येऊन गेलेल्या एका सिनेमाने इतकी उत्तम कल्पना देऊनही आपण त्यातून काहीच शिकलो नाही आणि कोरोना सारखा वायरस जगभरात थैमान घालतो आहे याचे वाईट वाटते. असो, सिनेमा एकदा तरी नक्की पहा


No comments:

Post a Comment