पवनाकाठचा धोंडी - गो. नि. दांडेकर - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, September 27, 2020

पवनाकाठचा धोंडी - गो. नि. दांडेकर

 


खरंतर मी काही चांगला वाचक नाही. म्हणजे अगदी एखादं पुस्तक वगैरे घेऊन मुद्दाम वाचायला बसावं हे माझ्या बाबतीत विरळाच (अगदी शाळेच्या वेळेपासूनच). त्यात ट्रेकर असून गोनिदांची पुस्तकं न वाचण्याचं पाप माझ्याहातून बरीच वर्षे घडलं आहे. एकदा धीर करून त्यांचं कुठलंसं पुस्तक वाचण्याविषयी एका मित्राला विचारलं तर त्याने 'अर्रे त्यांची भाषा खूप जड जाते समजायला..' असं काहीतरी सांगितलं म्हणून तो प्लान रद्द झाला. लॉकडाऊनच्या सहाव्या महिन्यात बर्‍याच गोष्टी करून चघळून झाल्याने शेवटी 'आता काय करावं?' या विचारांत असताना त्यांच्या 'पवनाकाठचा धोंडी' कादंबरीची प्रत हाती आली. थोडी सुरुवात चाळली आणि डोंगर, कडा, शेत, गड, किल्ला आदी ओळखीचे शब्द वाचनात आल्याने वाचत कादंबरी वाचत सुटलो. अगदी दोन दिवसांत साधारण ७ - ८ तासांत ते २०० पानी पुस्तक संपवून टाकलं.

'वाचत सुटलो' या शब्दांतच ते पुस्तक मला किती आवडलं असेल हे तुम्हाला कळून आलं असेल. अगदी एखाद्या जुन्या मराठी चित्रपटाला शोभेल अशी टिपिकल ड्रामा स्टोरी या कादंबरीमध्ये आहे. पण त्यातील नायक आणि नायिकेची मुख्य जोडी तुम्हाला नक्कीच आवडेल. खासकरून धोडीबा ढमाले हवालदारया नायकाची तुम्हाला भुरळ पडली नाही तरच नवल. कादंबरीविषयी अधिक काही लिहिणार नाहीय पण तुम्हाला गाव, गड-किल्ले, निसर्ग यांची आवड असेल तर ही कादंबरी नक्की वाचा, एवढेच सांगणे. गोनिदांची लेखनशैली खूप आवडली. त्यांचं आणखी एखादं पुस्तक लवकरच वाचायला सुरुवात करीन.


No comments:

Post a Comment