विविधतेत एकता खरंच अस्तित्वात आहे का? - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 17, 2019

विविधतेत एकता खरंच अस्तित्वात आहे का?


आजवर जगातला सगळ्यात मोठा विनोद जर कोणता असेल तर तो आहे ‘विविधतेत एकता’.. खरंच.. अगदी खरंय हे.. आपले लोक किती माठ आहेत जे ह्या वाक्यावर खुश होतात.. काही एकता वगैरे नाही.. जगात कुठेही एकता नाहीय.. आपण सगळेच विभागलो गेलो आहोत.. आणि हे विभाजन म्हणजे ‘विवीधता’ असे आपण मानतो.. खरंतर शाळेत आपल्याला हे शिकवले जाते ते आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून.. पण नाही.. आम्हाला आपलंच खरं करायचं आहे.. आपल्याला वाटतंय की आज जागतिक वैमनस्याचं कारण धर्म आहेत.. पण हे सर्वस्वी खरं नाहीय.. आपल्याला वैमनस्यासाठी कोणत्याही एका गोष्टीची गरज नाहीय.. आपण कोणत्याही गोष्टीने वैमनस्य घडवून आणू शकतो.. हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई आणि इतर अनेक धर्म असल्यामुळे आपल्यात तेढ आहे असे मानणारे खूप मूर्ख लोक जगात आहेत.. पण खरं म्हणजे कोणत्याही प्रकारचे विभाजन, मग ते मनुष्यनिर्मित असो वा निसर्गनिर्मित, हे वैमनस्याचे कारण ठरू शकते. आपण धर्म बाजूला केला तर पंथावरून भांडू शकतो, पंथ बाजूला केला की जातीवरून भांडू शकतो, जात बाजूला केली की पोटजातीवरून भांडू शकतो, पोटजात बाजूला केली की नात्यावरून भांडू शकतो, नाती बाजूला केली की हक्कावरून भांडू शकतो, हक्क बाजूला केले की क्रमावरून भांडू शकतो.. याऐवजी गरिबी-श्रीमंती, वर्णभेद, जमीन-जुमला, दिशा, स्थान, मान-अपमान, शिक्षण, हुद्दा, व्यवसाय इत्यादी आणि अगदी शारीरिक ठेवणीसारख्या निसर्गनिर्मित गोष्टीचं कारण काढून भांडू शकतो.. कारण आपला जन्मच मुळात जगाचा अंत करण्यासाठी झालाय अशी सगळ्यांची वृत्ती झालीय.. अगदी अश्मयुगीन काळापासून आपण दुफळीचा हा श्राप जपून ठेवला आहे.. आणि कित्येक वर्षे आपण तो वारसा हक्काने जपत आलोय.. आणि जपत राहणार आहोत.. तो नसता तर आजवर झालेली सगळी युद्ध झाली नसती.. शस्त्रांची गरज लागली नसती.. अण्वस्त्रासारख्या भयानक गोष्टीचा शोध लागला नसता.. आजवर कित्येक संत-महात्मे झाले.. त्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी आपण सर्रास विसरतो आहोत पण एक बुद्धिहीन माणसाने पेटवलेल्या निखाऱ्याचे आगीत रुपांतर करायला मात्र तत्काळ तयार असतो.. हाय दुफळीचे कारण म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे.. हा निसर्गनियम आपण सुरु ठेवला आहे.. आणि यातच आपण संपणार आहोत.. यात आपण संपूर्ण निसर्गालाही वेठीस धरले आहे.. हे माणसा.. कधीतरी तू तुझ्या ह्या दुफळीतून स्वतःला श्रेष्ठ ठरवून एकटा उरशीलही पण तेव्हा तू फक्त ‘एकटाच’ असशील.. आणि तू ‘माणूस’ही उरला नसशील..

No comments:

Post a Comment