साहसप्रेमीची प्रतिज्ञा - ADVENTURER’S PLEDGE - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 30, 2019

साहसप्रेमीची प्रतिज्ञा - ADVENTURER’S PLEDGE


आपण सगळेच भटकत असतो या ना त्या कारणाने.. कळत न कळत अनेक गोष्टींची पायमल्ली होत असते.. प्रत्येक मोहीम सुरू करताना जर आपण ही प्रतिज्ञा म्हणून / म्हणवून घेतली तर किमान प्रत्येकाला आपल्याला नक्की काय करायचे आहे त्याचं स्मरण करून देण्यास मदत होईल आणि मोहिमेची एक चांगली सुरुवात करता येईल. तुमचं काय मत आहे??

साहसप्रेमीची प्रतिज्ञा

मी प्रतिज्ञा घेतो की मी एक जबाबदार साहसप्रेमी होईन.
साहस आणि निसर्गाशी निगडीत सर्व लिखित आणि अलिखित नियमांचे मी पालन करीन.
ओळखीची किंवा अनोळखी स्थानांवर भटकंती करून जाताना ती जशी आहेत तशीच मी राखीन.
निसर्ग आणि त्यातील घटकांचा मी आदर करीन आणि त्यांचे संवर्धन करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन.
माझ्या निवासी किंवा प्रवासी ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाला मी जबाबदार होणार नाही.
माझ्या साहसातील सर्व ऋतु आणि परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी योग्य तो सराव आणि तयारी मी करीन.
माझ्या स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक्त ध्येय अथवा विक्रमांसाठी मी माझे किंवा इतरांचे आयुष्य धोक्यात घालणार नाही.
संपर्क आल्यास इतर साहसप्रेमी, स्थानिक आणि वयस्कर लोकांचा मी योग्य तो मान राखीन.
साहसभ्रमंती दरम्यान मी स्थानिक लोकांची जीवनपद्धती, स्वभाव आणि विचारसरणी यांचा आदर करीन.
भ्रमंतीच्या ठिकाणी मी स्वछतेचे पालन करीन आणि तेथील पर्यटन वारश्याचे जतन करण्याचा प्रयत्न करीन.
जीव ओवाळून टाकण्यासारखी छायाचित्रे मी काढीन परंतु छायाचित्र घेण्यासाठी जीवघेणा प्रयत्न करणार नाही. 
मी प्रतिज्ञा घेतो की मी साहसासाठी आवश्यक आणि योग्य गोष्टी मी शिकून घेऊन आणि त्यांचे पालन करीन तसेच माझ्या ओळखीतल्या साहसप्रेमींना सुद्धा त्या शिकवून त्यांचे पालन करण्यास सांगीन.


ADVENTURER’S PLEDGE

I pledge to be a responsible adventurer.
I will follow all written and unwritten rules of adventure & nature.
I will leave the known or explored places, same as I found them.
I will respect nature and its elements and will try my best to conserve them.
I will not become a reason for any kind of pollution at my place or places I visit.
I will be well trained and well prepared for all weathers and situations in my adventures.
I will not risk my or anyone’s life for my own targets and records.
I will respect other adventurers, locals & elders I interact with.
I will respect lifestyle, behaviour & ideology of local people during my adventures.
I will keep clean the places I visit and try my best to conserve their heritage.
I will take photos to die for, without dying for them.
I pledge to learn and follow good practices and teach and ask my acquaintances to follow them.



साहसप्रेमीची प्रतिज्ञा - ADVENTURER’S PLEDGE (Original)
उत्कर्ष एरंडकर / Utkarsh Erandkar

No comments:

Post a Comment