त्याने काय होईल? - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 11, 2013

त्याने काय होईल?

फेसबुकवर माझे ट्रेकिंगचे फोटो पाहून,
एक हितचिंतक: काय रे! जेव्हा बघावं तेव्हा नुसता ट्रेकिंग करत असतोस..

मी: हो! माझी हॉबी आहे ती..

हितचिंतक: अरे हो! पण एकसारखं ट्रेकिंग ट्रेकिंग काय?

मी: ओके, मग काय करू?

हितचिंतक: वेळ वाया घालवू नकोस.. काही तरी एक्स्ट्रा डिग्री वगैरे कर.. 

मी: त्याने काय होईल?

हितचिंतक: चांगली डिग्री मिळाली कि एखादा चांगला जॉब लागेल..

मी: त्याने काय होईल?

हितचिंतक: चांगला जॉब लागला तर पगार मिळेल..

मी: त्याने काय होईल?

हितचिंतक: चांगला पगार मिळाला तर सेविंग करता येईल..

मी: त्याने काय होईल?

हितचिंतक: सेविंग केलीस तर खूप पैसे जमतील..

मी: त्याने काय होईल?

हितचिंतक: खूप पैसे जमले तर मग पाहिजे ते करू शकशील..

मी: जसे?

हितचिंतक: जसे..  तुझी हॉबी जोपासता येईल..

मी: मग आता मी काय करतोय असं तुला वाटतंय?

भयाण शांतता.. 

(वरील घटना आणि त्यातील पात्रे काल्पनिक आहे. तरीही ट्रेकिंग 'फिल्ड' मध्ये 'नसणाऱ्या' व्यक्तींच्या मनातील 'आपल्या'बद्दलचे भावना या घटनेत उतरविण्याचा हा प्रयत्न.. )


No comments:

Post a Comment