मधमाश्यांचा हल्ला : काही तथ्ये आणि घ्यावयाची काळजी - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, September 1, 2013

मधमाश्यांचा हल्ला : काही तथ्ये आणि घ्यावयाची काळजी

आपण ही काळजी घेतल्यास, मधमाश्यांपासून होणारी हानी काही प्रमाणात टाळता येईल आणि दुखापत कमी करता येईल.

मधमाश्यांना दूर ठेवण्यासाठी:

1. हलक्या रंगाचे कपडे वापरा.

2. जास्त सुगंधी अत्तर, साबण, शाम्पू, डीओडोरंट वापरू नयेत.

3. केळी, कांदा, लसूण (इत्यादी) आणि त्यापासून बनलेली तीव्र सुगंध असलेली उत्पादने टाळा.

4. स्वच्छ कपडे वापरा, स्वच्छ रहा. घामाच्या वासाने मधमाश्या चिडतात.

5. फुलझाडांपासून लांब रहा.

6. आपल्या आजूबाजूचा परिसर साफ ठेवा. सहल, ग्रील्स इत्यादी अन्न कचरा होणाऱ्या ठिकाणी मधमाश्यांचा त्रास जास्त संभवतो.

7. मधमाश्या आणि गांधीलमाश्या धूराचा द्वेष करतात. त्यामुळे त्यांच्या अधिवासाजवळ किंवा वसाहतीअंतर्गत आग किंवा धूर करू नका.

दंशापासून बचाव:

1. एखाद दुसरी मधमाशी आपल्याभोवती घोंगावत असल्यास तीला प्रतिक्रिया देऊ नका. चेहरा झाकून घ्या, किंवा जमिनीवर उताणी झोपा. (मधमाशी किंवा गांधीलमाशी, चेहऱ्यावर दंश करण्याची शक्यता सर्वात जास्त असते.)

2. त्यांना त्रास न दिल्यास, मधमाश्या आणि गांधीलमाश्या आपल्याला त्रास देत नाहीत. पण एखादी मधमाशी/गांधीलमाशी हाकलल्यानेही त्या हल्ला करू शकतात.

3. एकाचवेळी अनेक मधमाश्या आणि गांधीलमाश्यांनी आक्रमण केल्यास (नीट काळजी घेऊन, बुडणार नाही इतक्या खोल) पाण्यात उडी मारावी. माश्या दंश करताना एक रसायन सोडतात, ज्याच्या वासामुळे इतर माश्यांना आक्रमण करून बचाव करणारा इशारा दिला जातो; म्हणजे दंश करणाऱ्या माश्या जेवढ्या जास्त, तेवढी तो ‘इशारा’ जास्त. (मात्र इथे श्वासोच्छ्वासासाठी पाण्यातून बाहेर येण्याचा प्रश्न उपस्थित होतो, कारण माश्या काही काळ तेथे घोंगावत बसण्याची शक्यता आहे.)

4. या सर्वांत मधमाश्या किंवा गांधीलमाश्यांच्या अधिवासापासून किंवा हल्ल्यापासून लवकरात लवकर दूर जाणे सर्वोत्तम. (सौजन्य: राजन महाजन)

दंशावर उपचार:

1. शक्य तेवढ्या लवकर, हलक्या हाताने काटा काढून टाका. काटा खेचू नका, दाबू नका कारण त्यामुळे अधिक विष दाबले जाऊ शकते.

2. संसर्ग टाळण्यासाठी, दंशाची जागा, साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. वेदना, खाज आणि सूज कमी करण्यासाठी याचा फायदा होईल.

बाजारात उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या प्रभावीपणामध्ये बदल असू शकतो आणि त्यात मधमाशीच्या विषासारखेच हानीकारक विषारी साहित्य असू शकतात. त्याऐवजी हे करून पहा:

बर्फ : बर्फामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पाऊन रक्तातील विषप्रवाह कमी होण्यास मदत होते, त्यामुळे सूज कमी होते. बर्फामुळे येणारी आंशिक बधिरता वेदना आणि खाज कमी करते.

खाण्याचा सोडा : बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण करा आणि दंशावर लावा. सोड्यातील नैसर्गिक अल्कधर्म विषातील आम्लधर्माचा परिणाम कमी करण्यास मदत करतो.

व्हिनेगर : गांधीलमाशी (wasps) च्या दंशावर व्हिनेगरचा पर्याय उपयुक्त आहे. ‘Baking soda for Bees, Vinegar for Wasp’ हे (वर्णमालेचा वापर करून तयार केलेलं) घोषवाक्य लक्षात ठेवावे. टुथपेस्ट: विश्वास बसत नाही ना? परंतु बेकिंग सोड्याच्या उपायाप्रमाणेच टुथपेस्टचा वापर दंशावर होतो. टुथपेस्टमध्ये थोडेसे ग्लिसरीन मिसळून त्याचा प्रभाव वाढवता येईल.

7 comments:

  1. उपयुक्त माहिती दिलीत उत्कर्षजी.. एक छोटीशी सुचना अशी होती कि आपण लिहिलेला लेख मराठी असल्यामुळे Labels मध्ये देखील मराठीतुन दोन तीन संबंधित शब्द लिहिल्यास गुगल किंवा इतर ठिकाणी मराठीतुन शोध घेताना ही उपयुक्त माहिती लगेच सापडेल..!! पुढील लेखनासाठी शुभेच्छा..!!

    ReplyDelete
  2. मित्र यशोधन, आपल्या पर्तीक्रीयेसाठी आणि मार्गदर्शनासाठी धन्यवाद. आपल्या सांगण्यानुसार मी मराठीतून लेबल्स जोडले आहेत. आशा आहे की ते इतरांना उपयोगी होतील. पुनःश्च धन्यवाद.

    ReplyDelete
  3. "राजन महाजन" ची प्रतिक्रिया :

    १. " एकाचवेळी अनेक मधमाश्या आणि गांधीलमाश्यांनी आक्रमण केल्यास (बुडणार नाही इतक्या खोल) पाण्यात उडी मारणे सर्वोत्तम " ही धारणा एकदम चुकीची आहे. पाण्यात बुडी मारल्यावर श्वास कसा घेणार ? माझ्यावर जेव्हा माश्यांचा हल्ला झाला तेव्हा त्या साधारण तीन तास माझ्या अवतीभवती घोंघावत मला चावत होत्या.

    २. " एखाद दुसरी मधमाशी आपल्याभोवती घोंगावत असल्यास तीला प्रतिक्रिया देऊ नका. चेहरा झाकून घ्या, किंवा जमिनीवर उताणी झोपा." - प्रतिक्रिया देऊ नका आणि तेथून लवकर दूर व्हा. माश्या सहसा इशारा देतात तो समजून त्या जागेपासून दूर गेल्यास हल्ला टाळता येतो.

    ReplyDelete
  4. ऊत्कर्श… ब्लोग चा विषय उत्तम अहे .

    माझावर भैरव गड(कोयना) येथे हल्ला झालेला. त्यानंतर आम्ही केलेल्या वैज्ञानिक चीर फाडेतून काही माहिती वाचनात आली ती

    मधमाश्यांचा हल्ला करण्या मागचा हेतू हा शत्रू ला त्यांच्या हद्दीतून दूर घालवण्याचा अस्तो. त्यामुळे एका विशिष्ठ मर्यादे बाहेर गेल्यावर त्या पाठलाग सोडून देतात.

    पाण्या खाली लपून बसण्याचा प्रयत्न फारसा कामाचा नाही. कारण माश्या तिथेच घुटमळत रहतत. राजन याने वर नमूद केल्या प्रमाणे ३ तास पेक्ष जास्त आमच्यावर हल्ला झालेला. त्या सगळ्यात पाण्या खाली श्वास घेणे अशक्य झाले अस्ते. आणि त्या मधील आणखी महत्वाचा धोका असा कि माश्या मागे लागल्या आहेत म्हणून दिसेल त्या पाण्यात एखादी व्यक्ती (बिथार्ल्यामुळे)उडी मारू शकते. हे खूपच धोकादायक आहे.

    आमच्यावर झालेल्या हल्यात मी स्वतः पळून गेलो(घाबरून) आणि ते करताना पायांना आणि हाताला ३ ठिकाणी खूप मोठा मुका मार लाग्ला. पुढे मी ३ दिवस नित चालू शकत नव्तो.

    ReplyDelete
  5. उत्तम माहिती आहे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  6. One more thing to add : Unfortunately if any body has been victimized of bee attacks, try to reach to the nearest Hospital as soon as possible, as somebody might be the allergic to it and react with vomiting, nausea and other health issues?
    http://www.mayoclinic.com/health/bee-stings/DS01067/DSECTION=symptoms

    http://www.wikihow.com/Treat-a-Bee-Sting

    Recent incident of my one of friend's relative, who visited Fort Rohida from a different (enroute Varandha ghat) and was victimized through swarm of Bees... they literally ran away but still could't get protected... moreover they're novice trekkers, but still did a very good job of begging the villagers to get hospitalized immediately, both of them started vomiting and feeling dizzy ...for which Humble Villagers as usual ...helped out them; now both are of out of Danger and recuperating fast....

    ReplyDelete