रॉक क्लायम्बिंगला कायद्याचा दोरखंडात बांधु पाहणाऱ्यांनो, जरा कृपया इकडे लक्ष द्या - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 14, 2014

रॉक क्लायम्बिंगला कायद्याचा दोरखंडात बांधु पाहणाऱ्यांनो, जरा कृपया इकडे लक्ष द्या

रॉक क्लायम्बिंगला कायद्याचा दोरखंडात बांधु पाहणाऱ्यांनो, जरा कृपया इकडे लक्ष द्या:

दुसऱ्याच्या घरात हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच्या घरातला उजेड पाहावा.
खालील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आपल्याकडे आहेत काय?

१.  नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांना प्लास्टिकच्या वस्तू आणण्यासाठी बंदी आहे, मग पार्कमध्ये आतल्या भागात फेरीवाले सर्रास व्यापार करताना आणि कचरा करताना कसे आढळतात.

२.  ‘सो कॉल्ड’ ‘कोअर’ भागामध्ये फेरीवाले, दाणेवाले यांचा चाललेला मुक्त वावर, प्रेमी युगुलांचे चाळे तुम्हाला दिसून येत नाहीत का?

३.  याच कोअर भागात चोरटी लाकूडतोड आणि वृक्षचोरी चालते त्याकडे कोणाचे लक्ष आहे?

४.  पार्कचा मुख्य उद्देश वन्यजीवांचे रक्षण असताना (माकडे आणि तुरळक पक्षी वगळल्यास) तुम्ही किती वन्यजीव सुरक्षित ठेऊ शकला आहात?

५. पार्कमध्ये किती वाघ आणि सिंह शिल्लक आहेत? त्यांची आबाळ का होत आहे?

६.  पार्कमध्ये पिकनिक आणि मजा-मस्तीच्या नावाखाली ‘जी’ ‘xxx-मस्ती’ चालते, मुलींच्या छेडखानी चालते, तेव्हा तुम्ही कुठे असता?

७.  पिकनिकर्स कडून पार्कची सर्रास मोडतोड सुरु असते तेव्हा आत हजर असणारे तुमचे सुरक्षा रक्षक कुठे असतात?

८.  वॉशरूम, टॉईलेट, पाण्यासारख्या साध्या मुलभूत सोयी तुम्हाला पुरवताना मारामार आहे. तिथे तुमचे लक्ष का जात नाही?

९.  ‘कोअर भागाला धक्का लागतो’ हे खरे कारण आहे की १००० हजार रुपयांमागे केवळ ३५ रुपये एन्ट्री फी मिळते हे खरे कारण आहे?

१०.  तसे असेल तर मग ह्या कारणासाठी उगाच ही नाटकं कशाला?

११.  सरावाचे बोल्डर्स अशा भागात येत असतील तर मग असे कितीसे नैसर्गिक बोल्डर्स तुम्ही मुंबईत शिल्लक ठेवले आहेत?

१२.  इतर डोंगर हळू हळू नामशेष का होत आहेत? ते कोअर नाहीत का?

१३.  सरावादरम्यान अशा कोणत्या नैसर्गिक घटकांना गिर्यारोहकांनी धक्का लावला आहे, जो वनराणीपेक्षा जास्त आहे?

१४.  आजूबाजूचे अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी तुमची इतकी तारांबळ का उडते?

१५.  पिकनिकर्स आणि प्रेमी(?) युगुलांपेक्षा गिर्यारोहक तुम्हाला निसर्गाला धोकादायक का वाटतात?

१६.  गिर्यारोहकांएवढी वाट वाकडी आणि तंगडतोड करून हा निसर्ग पाहण्यासाठी असे कोणते निष्पाप लोक रानावनात हिंडतात?

१७.  सरकारी योजना राबवून तुम्ही असे काय ‘महत्कार्य’ आमच्या क्षेत्रात करणार आहात? चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, २ जी, ३ जी, इत्यादी ‘महत्कार्य’ करून तुमची पोटे शांत झाली नाहीत का?

१८.  आपली मूळ कामे सोडून ह्या नसत्या उठाठेवी करण्याचे ‘प्रयोजन’ काय? हे म्हणजे ‘शेती’ सोडून ‘क्रिकेट’ प्रमोट केल्यासारखे वाटत नाही का?

१९.  या ऐवजी सगळे एकत्र येऊन यावर एखादा ‘सुवर्णमध्य’ साधता येतो का, हे पाहणे जास्त गरजेचे वाटत नाही का?

२०.  व्यापक दृष्टीकोनातून विचार केल्यास, सगळ्याच गोष्टींत निर्बंध घालून, ‘सेटलमेंट’ अपेक्षित करून, आपल्या देशाची खरंच प्रगती होईल असे तुम्हाला वाटते का?

गिर्यारोहक मंडळी खूप शिस्तप्रिय असतात, भले ते चोरी-छुपे सरावाला येत असतील, निसर्गाला धक्का पोहोचवून ते कोणतेही कार्य करणार नाहीत, हे लक्षात घ्या. तुम्हाला खरंच सगळ्यांची काळजी असेल तर आम्हा गिर्यारोहक मंडळीना विश्वासात घेऊन बोलणी करा, आमचा अपेक्षेपेक्षा जास्त मदत तुम्हाला मिळेल याची खात्री आम्ही तुम्हाल देतो.

बाकी सुद्न्य आहात, बहुत काय लिहिणे..

एक सच्चा गिर्यारोहक

उत्कर्ष एरंडकर
utkarsh.erandkar@gmail.com



No comments:

Post a Comment