सुधागड वर आलेले 'अजब'(?) अनुभव - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 8, 2014

सुधागड वर आलेले 'अजब'(?) अनुभव

भाग एक:




सुधागडावर गेलो होतो शनिवार - रविवारी.. सार्वजनिक वाहनानाच्या उत्तम वेळापत्रकानुसार किल्ल्यावर पोहोचायला रात्र झाली.. सरकारवाड्यावर मुक्काम ठोकला.. एक मध्यमवयीन माणूस तिथे सरबराईसाठी हजर होता.. त्याने आम्हाला विचारलं "पानी लगने वाला है क्या??" आम्ही सुद्धा होकार दिला.. नंतर कळून आलं की हा हिंदींत का बोलतो आहे आपल्या सगळ्यांशी??

ग्रुप मधल्या मैत्रिणीने तर्क लावला. " कदाचित आपण मुंबईकडले वाटत आहोत म्हणून बोलत असावा.."

जेव्हा तो पुन्हा आला तेव्हा त्याला सांगितलं की आम्ही मराठीच आहोत मग तुम्ही मराठी का नाही बोलत आहात? तर तो म्हणाला, "मै मराठी नही हुं| मराठी माणूस होता इतने जल्दी काम करता क्या??"

डोकं सुन्न झालं.. काय बोलावं कळेना.. बरं त्याला उलट बोलावं तर भांडण सुरु झालं असतं.. पण तेवढ्यात तो निघून गेला.. आम्ही थकलो होतो त्यामुळे अजूनच शीर उठली.. तिथे वाड्याच्या बाजूला एक मामी एवढी वर्षे सुधागडवर येणाऱ्या लोकांची मदत करतायत.. आता त्या म्हाताऱ्या झाल्यायत आणि तोच फायदा घेऊन हा 'उपरा' तिथे बस्तान मांडू पाहतोय.. त्याच्या अरेरावीवरून थोड्याच दिवसांत तो तिथे जम बसवेल आणि मग सगळा वाडा हडपुन बसेल असा माझा तरी अंदाज लागलाय..

त्यांची सोय करतोय मी लवकरच.. पण तुम्हालाही शक्य झाल्यास त्याची काहीतरी 'सोय' करावी... नाहीतर सुधागडावर पाणी सोडावे लागेल...


No comments:

Post a Comment