मातृभाषा जपा - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, August 13, 2015

मातृभाषा जपा

आपल्याला इंग्रजी किती चांगलं येतं या कडे सगळ्यांचं लक्ष असतं; पण या नादात आपण आपली मातृभाषा किती दुर्लक्षित करत आहोत हे कळूनच येत नाहीय.. इंग्रजांच्या आगमनानंतर जी स्थिती किल्ल्यांची झाली तीच आपल्या मातृभाषेची होत आहे.. फक्त किल्ले भौगोलिकदृष्ट्या डोळ्यासमोर आहेत म्हणून त्यांची झीज दिसून येतेय.. मातृभाषेला तोही आधार नाही..

अनेकदा आपण सुरवात हिंदीने किंवा इंग्रजीने करतो आणि काही वेळाने लक्षात येते की समोरची व्यक्ती मातृभाषिकच आहे.. म्हणून कोणाशीही बोलताना सुरवात मातृभाषेने करा.. जर अडचण आलीच तर राष्ट्रभाषेने करा.. तरीही अडचण आलीच इंग्रजी वापरूया.. कारण इंग्रजी वापरायला 'जग' बसले आहे.. मातृभाषा 'आपण'च जपली पाहिजे..

अजूनही वेळ गेलेली नाही.. आपापली मातृभाषा जपा..

No comments:

Post a Comment