उकळत्या पाण्यातील बेडूक - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, December 19, 2015

उकळत्या पाण्यातील बेडूक

एक बेडूक एका भांड्यात ठेवा. त्या भांड्यात पाणी टाकून पाणी गरम करण्यास सुरुवात करा. पाणी तापायला सुरुवात होताच बेडूक आपल्या शरीरात बदल घडवून आणायला सुरुवात करतो. जसे जसे तापमान वाढत जाते, तसे तसे तो बेडूक आपल्या शरीराच्या तापमानाचे समायोजन (एड्जस्टमेंट) करू लागतो. पाणी जेव्हा उच्चांक गाठून उकळण्यास सुरुवात करू लागते, तेव्हा मात्र बेडकाला समायोजन करणे काही जमत नाही आणि म्हणून तो उडी मारण्याचा प्रयत्न करू लागतो. पण त्यात तो अयशस्वी होतो कारण उडी मारण्यास आवश्यक ताकद त्याने शरीराचे तापमान समायोजन करण्यासाठी खर्ची घालवलेली असते. थोड्या वेळात बेडूक मरण पावतो.

तर, बेडकाचा मृत्यू कशामुळे झाला??
जरा विचार करा..

मला माहित आहे, की तुमच्यातील अनेकजण म्हणतील की उकळत्या पाण्यामुळे तो मरण पावला. पण लवकरच असे कळून येईल की तो बेडूक स्वतःच्या असमर्थतेमुळे मरण पावला. योग्य वेळी उडी मारण्याचा निर्णय घेण्याची असमर्थता..

आपण सुद्धा लोकांना आणि परिस्थितीला सांभाळून घेतले पाहिजे. पण आपल्याला याचे सुद्धा भान राखता आले पाहिजे की आपण केव्हा सांभाळून घेतले पाहिजे आणि केव्हा पुढे निघून गेले पाहिजे. असे अनेक प्रसंग असतात जेव्हा आपल्याला त्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यात योग्य निर्णय घ्यावे लागतात.
जर आपण लोकांना आणि परिस्थितीला आपले शारीरिक, भावनिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि मानसिक शोषण करू दिले तर ते तसं करतच राहतील.

योग्य वेळी उडी मारण्याचा निर्णय घ्यायला शिका.
आपल्या शरीरात ताकद आहे तोवर उडी मारण्यास शिका.

हिम्मत है मर्दा, तो मदत करे खुदा...

एका इंग्रजी लेखाचा हा अनुवाद आहे. लेखकाचे नाव कळू शकले नाही मात्र कदाचित हे एक 'रूपक' असावे.

No comments:

Post a Comment