गिर्यारोहणाची साधन-सामग्री - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 19, 2013

गिर्यारोहणाची साधन-सामग्री

पावसाळा संपत आल्यावर ट्रेकिंग जोशात सुरु होते. सप्टेंबरपासून अगदी मार्च-एप्रिल पर्यंत आपण गिर्यारोहणाचा आनंद लुटतो. यामध्ये एका दिवसाचे, एका रात्र मुक्कामाचे (ओव्हरनाईट), शिबीर (कँपिंग) असे अनेक ट्रेकिंग प्लान्स आखले जातात. जोशात बॅकपॅक भरली जाते आणि ट्रेक सुरु होतो. मात्र प्रत्यक्ष ट्रेकवर गेल्यावर लक्षात येतं की अमुक वस्तू आणायची विसरलोय. अनेकदा अशी वस्तू महत्वाची असते आणि ती जवळ नसल्याने संपूर्ण ट्रेक त्रासदायक होतो. असे होऊ नये म्हणून विविध प्रकारच्या ट्रेकदरम्यान आपल्याला आवश्यक असणाऱ्या साधन-सामग्रीची एक तयार यादी येथे दिली आहे; जेणेकरून प्रत्येक ट्रेकच्या सुरुवातीला महत्वाच्या वस्तू सोबत घेणे तुम्हाला सोपे जाईल व ट्रेक आनंददायक करता येईल.

प्रस्तुत यादीमध्ये, ट्रेकिंग दरम्यान सोबत बाळगण्याच्या वस्तू, साधन-सामग्री, त्यांच्या गटानुसार दिली आहे. उदाहरणार्थ, येथे नमूद ‘प्रथमोपचार साहित्य’ जरी वेगवेगळया क्रमात दिले असले तरीही ते सोबत ठेवताना एकाच वॉटरप्रुफ बॅगेत किंवा पेटीमध्ये एकत्र ठेवावे. प्रथमोपचार साहित्य (फर्स्टएड कीट) आणि जीवनरक्षक (सर्वायवल कीट) हे फक्त लीडरने सोबत ठेवायचे असते, असं मानलं जातं; पण परंतु ह्या दोन्ही गोष्टी ट्रेकमधील प्रत्येक सदस्याने सोबत ठेवणे आवश्यक आहे. यादीतील वस्तू उपयोगानुसार कमी-जास्त करता येतील; परंतु पूर्णपणे टाळून चालणार नाही.

यादीत ट्रेकच्या प्रकारानुसार विभाग केले आहेत. प्रत्येक विभागात खुण केलेल्या वस्तू त्या विभागातील ट्रेकदरम्यान सोबत ठेवणे आवश्यक आहे. शिबिरादरम्यान जवळजवळ सर्वच वस्तू सोबत घ्यावे. ‘गट साहित्य’ विभागातील वस्तू, लीडरच्या सांगण्यानुसार गटामध्ये वाटून सोबत ठेवाव्यात व वापराच्या वेळी एकत्र कराव्यात. प्रत्येक सदस्याने, त्याच्या जवळ दिलेल्या गट साहित्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लीडरने ‘गट साहित्य’ वगळता इतर सर्व साहित्य सोबत ठेवणे बंधनकारक आहे, किंबहुना हे त्याचे कर्तव्यच आहे; कारण त्याच्यावर इतर सदस्यांची जबाबदारी असते. आपत्ती, अपघात केव्हाही सांगून येत नाही, ही गोष्ट सतत लक्षात ठेवली पाहिजे.



यादी जरी लांबलचक वाटली असली तरी त्यातील वस्तू, साधन-सामग्री लहान आहेत. बॅकपॅकमध्ये त्यांना लागणारी जागा नगण्य आहे. पण त्यांची उपयुक्तता खूप आहे. उदारणार्थ ट्रेकिंगच्या सुरुवातीच्याच टप्प्यात बुटाचा सोल निखळला तर तुम्ही काय कराल? अश्या निखळलेल्या सोलसह संपूर्ण ट्रेकिंग किती त्रासदायक होऊ शकतो याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे, म्हणजेच हे स्वानुभवाचे बोल आहेत. अश्यावेळी, ‘इंस्टंट ग्लू/सोल्युशन’चा वापर करून निखळलेला सोल तत्काळ चिकटवून किमान त्या ट्रेकपुरता बूट चालण्यासाठी सक्षम करता येतो. एखाद्या खोल टाक्यातील पाणी, नॉयलॉन दोरी आणि कोलॅप्सिबल बादलीने काढता येते. पाणी कमी असताना प्रात:विधीसाठी टिश्यू पेपर वापरता येतात. चढता, उतरताना वजनामुळे गुडघे दुखू लागतात. अश्या असह्य वेदनेतून काही काळ आराम देण्यासाठी ‘दु:खदबाव पट्टी’चा उपयोग होतो. खरचटणे, काटे टोचणे, इत्यादी लहान सहान जखमांसाठी अँटीसेप्टिक मलम कामास येते. अश्या अनेक प्रसंग आणि आपत्तीतून सुटका करण्यासाठी या यादीतील वस्तू आपल्याला नक्कीच उपयोगी होतात.

मित्रांनो, ह्या यादीतील सर्वच वस्तू आवश्यक आहेत हे पटवून देणारा एखादा प्रसंग घडण्याची वाट पाहत बसू नका. यादीतील सर्वच वस्तू, साधन-सामग्री ट्रेकदरम्यान सोबत बाळगा. या सोबत एक महत्वाचे सूत्र लक्षात ठेवा, जे कोणत्याची लहान मोठ्या ट्रेक, शिबिरादरम्यान तुम्हाला उपयोगी होईल:

उपायापेक्षा खबरदारी सर्वोत्तम (PREVENTION IS BETTER THAN CURE)

या सूत्रानुसार नियम पाळा, अपघात टाळा.. मात्र तरीही प्रसंग आलाच तर सावध रहा, तयार रहा.. शरीराने आणि मनानेही.. वरील सर्व साधन-सामग्री आहेच तुमच्या मदतीसाठी..

क्रमसाहित्याचे नावगटएक दिवसीय२/३ दिवसीयशिबीर(कँप)
०१
सुती शर्ट / टी-शर्ट (शक्यतो पूर्ण बाह्याचे)
कपडे
०२
फुल पँट (कन्व्हर्टीबल असल्यास उत्तम)
कपडे
०३
हॅट / कॅप
कपडे
०४
ट्रेकिंग बूट (घोट्यापर्यंत)
कपडे
०५
पायमोजे (जोडी) (प्रतिदिन १, कमाल ३)
कपडे
०६
अंतर्वस्त्रे (जोडी) (प्रतिदिन १, कमाल ३)
कपडे
०७
बहुपयोगी कानटोपी (बंदाना/बफ)
कपडे
०८
अधिक कपड्यांचे जोड (प्रतिदिन १, कमाल ३)
कपडे
०९
सनग्लासेस (उन्हाळ्यात उपयोगी)
कपडे
१०
गरम कपडे (फ्लीसचे पूलओव्हर, जॅकेट, पँट, हातमोजे) (हिवाळा ऋतू)
कपडे
११
पावसाळी कपडे (रेनकोट/पोंचो, रेनपँट, रेनकॅप)
कपडे
१२
गेटर्स (जंगलटप्प्यांसाठी)
कपडे
१३
निद्रावस्त्रे (ऋतूनुसार)
कपडे

१४
बीपीए प्लास्टिकची बाटली (२ x १ लिटर)/ हायड्रेशन ब्लॅडर
शिधा-सामग्री
१५
तयार खाद्यपदार्थ (सर्व दिवसांसाठी पुरेसे + एका दिवसाचे राखीव)
शिधा-सामग्री
१६
चोकोलेट, सुका मेवा, ऑरेंज पावडर
शिधा-सामग्री
१७
चहा पावडर / साखर / दुध पावडर
शिधा-सामग्री
१८
रोकड, डेबिट/क्रेडीट कार्ड
बटवा
१९
कॅमेरा, मेमरी कार्डस्, चार्जड् बॅटरी, राखीव चार्जड् बॅटरी
छंद साहित्य
२०
ट्रेकचे वेळापत्रक, ट्रेकदरम्यान संपर्कांची यादी (एक प्रत घरी द्यावी)
आवश्यक
२१
बॅकपॅक + रेनकव्हर
आवश्यक
२२
मोबाईल + चार्जर (सौर असल्यास उत्तम)
आवश्यक
२३
कानपट्टी
आवश्यक
२४
ओळखपत्र (आवश्यक माहिती आणि फोटोसह)
आवश्यक
२५
नोंदवही, पेन
आवश्यक
२६
परवानग्या, शिफारसपत्र (जलरोधक पिशवीत, २/३ झेरॉक्ससह)
आवश्यक
२७
पॉलीथीन पिशव्या (केरकचरा, ओले कपडे इ.साठी)
आवश्यक
२८
जलरोधक पिशव्या (ड्राय बॅग्स) (महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी)
आवश्यक
२९
ट्रेकिंग (वॉकिंग) स्टीक
आवश्यक
३०
दिशादर्शक (कंपास)
मार्गदर्शक साहित्य
३१
नकाशा, मार्गदर्शक/माहिती पुस्तक
मार्गदर्शक साहित्य
३२
टॉवेल, पंचा, रुमाल
स्वच्छतासाहित्य
३३
डीओडोरंट / परफ्युम (शरीर दुर्गंधीसाठी उपयोगी)
स्वच्छतासाहित्य
३४
जुने कागद/वर्तमानपत्रे, टिश्यू पेपर
स्वच्छतासाहित्य
३५
टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, स्क्रबर इ.
स्वच्छतासाहित्य

३६
सुती कापडाचा तुकडा (७ वर्गफुट)
स्वच्छतासाहित्य

३७
वैयक्तिक औषधे (वैयक्तिक त्रास, अॅलर्जी इ.साठी)
प्रथमोपचार साहित्य
३८
जलरोधक बँडेज्स, अॅडेसीव बँडेज्स (३/४ वेगवेळ्या आकारात)
प्रथमोपचार साहित्य
३९
अँटीसेप्टिक क्रीम/पावडर (बोरोलीन/निओस्प्रीन)
प्रथमोपचार साहित्य
४०
अँटीसेप्टिक लोशन (सॅवलॉन/डेटॉल)
प्रथमोपचार साहित्य
४१
अॅस्पिरीन, पॅरासेटामॉल पेन रीलीवर्स, क्रोसिन टॅबलेट्स
प्रथमोपचार साहित्य
४२
मेडिकल कापूस, कात्री, ब्लेड
प्रथमोपचार साहित्य
४३
मोस्किटो/इंसेक्ट रेपेलंट क्रीम, मच्छरदाणी (जंगलातील मुक्कामाकरिता)
प्रथमोपचार साहित्य
४४
सुई, सेफ्टी पिन्स, हूक्स, चिमटा
प्रथमोपचार साहित्य
४५
पेट्रोलिअम जेली
प्रथमोपचार साहित्य
४६
अँटासीड्स (इनो/जेल्युसील टॅबलेट्स)
प्रथमोपचार साहित्य
४७
पुनर्जलीकरण औषधे (रीहायड्रेशन) (इलेक्ट्रॉल/ग्लूकॉन-डी)
प्रथमोपचार साहित्य
४८
निर्जंतुक ड्रेसिंग बँडेज्स (३/४ वेगवेळ्या आकारात)
प्रथमोपचार साहित्य
४९
टॅल्कम पावडर, सनस्क्रीन क्रीम (उन्हाळ्यात उपयोगी)
प्रथमोपचार साहित्य
५०
जलशुद्धीकरण गोळ्या/मिश्रण
प्रथमोपचार साहित्य
५१
दुःखदबाव पट्टी (क्रेप बँडेज्स) (२-३)
प्रथमोपचार साहित्य
५२
प्लास्टिक/लाकडी काड्या/पट्ट्या (१०-१२), इलॅस्टीक
प्रथमोपचार साहित्य
५३
थर्मामीटर
प्रथमोपचार साहित्य
५४
कापडाचे त्रिकोणी तुकडे (६)
प्रथमोपचार साहित्य
५५
पेनबाम (मूव, आयोडेक्स, ओम्नीजेल)
प्रथमोपचार साहित्य
५६
भोजनसाहित्य (थाळी, मग, चमचा, काटा)
शिबीर साहित्य
५७
स्लीपिंग बॅग (जलरोधक आवरणासहित)
शिबीर साहित्य
५८
स्लीपिंग मॅट (आवरणासहित, गुंडाळीकरून)
शिबीर साहित्य
५९
फ्लोटर्स (सँडल्स)
शिबीर साहित्य
६०
हवेची उशी
शिबीर साहित्य
६१
निर्वात पिशव्या (कम्प्रेशन बॅग्स)
शिबीर साहित्य
६२
तंबू + प्लास्टिकचा तुकडा (७ वर्ग फुट)
शिबीर साहित्य
६३
दिवे / कंदील (राखीव चार्जड् बॅटरीसह, सौर असल्यास उत्तम)
शिबीर साहित्य
६४
प्रथमोपचार आणि जीवनरक्षक साहित्य मार्गदर्शन पुस्तिका
जीवनरक्षक साहित्य
६५
बहुपयोगी स्विस आर्मी नाईफ (विक्टोरीनॉक्स/जर्बर)
जीवनरक्षक साहित्य
६६
विजेरी (टॉर्च) (राखीव चार्जड् बॅटरीसह, सौर/क्रँक असल्यास उत्तम)
जीवनरक्षक साहित्य
६७
माचीस, लायटर (जलरोधक पिशवीमध्ये)
जीवनरक्षक साहित्य
६८
सेफ्टी पिन्स, टूथपिक्स
जीवनरक्षक साहित्य
६९
साखर, मीठ (लहान हवाबंद प्लास्टिक पाकिटे)
जीवनरक्षक साहित्य
७०
शिट्टी (हुक आणि दोरीसहित)
जीवनरक्षक साहित्य
७१
सुई-दोरा (शिवण-साहित्य)
जीवनरक्षक साहित्य
७२
नॉयलॉन दोरी (पॅराकॉर्ड) (५० मीटर)
जीवनरक्षक साहित्य
७३
इमर्जन्सी ब्लँकेट (स्पेस ब्लँकेट)
जीवनरक्षक साहित्य
७४
इस्टंट ग्लू/सोलुश्यन
जीवनरक्षक साहित्य
७५
मेणबत्त्या (२)
जीवनरक्षक साहित्य
७६
फ्लिंट फायर स्टार्टर (तातडीची आग पेटवण्यासाठी)
जीवनरक्षक साहित्य
७७
मासे पकडण्याचे आकडे + तंगुस (२० फुट)
जीवनरक्षक साहित्य
७८
हेडलँप (राखीव चार्जड् बॅटरीसह)
जीवनरक्षक साहित्य
७९
मोठा चाकू (हंटर नाईफ)
जीवनरक्षक साहित्य
८०
लोहचुंबक (आयताकार/ध्रुवांसह)
जीवनरक्षक साहित्य

८१
भिंग (मॅग्नीफाईंग ग्लास)
जीवनरक्षक साहित्य

८२
सर्वायवल सिग्नल मिरर
जीवनरक्षक साहित्य

८३
तारेची गुंडाळी (१० फुट) (फासे लावण्यासाठी)
जीवनरक्षक साहित्य

८४
टाकाऊ सुत/कापसाचे गोळे (वेस्ट कॉटन), लाकडाचा भुसा
जीवनरक्षक साहित्य

८५
दुर्बीण (उच्च प्रतीची आणि लहान असल्यास उत्तम)
गट साहित्य



८६
कॅरॅबिनर्स (२)
गट साहित्य



८७
प्रस्तरारोहण दोर (क्लायबिंग रोप) (१० मि.मी., २५ मीटर)
गट साहित्य



८८
प्रस्तरारोहण पट्टी (क्लायबिंग टेप/स्लिंग) (१० मि.मी., १० फुट) (२)
गट साहित्य



८९
कोलॅप्सिबल/फोल्डिंग बादली / मोठी प्लास्टिक पिशवी
गट साहित्य



९०
जेवण बनविण्याची भांडी (सांडशीसह)
गट साहित्य



९१
हातोडी + लोखंडी पाचरी (४-५, वेगवेगळया आकाराच्या) (प्रस्तरारोहण अपेक्षित असल्यास)
गट साहित्य



९२
लाईफजॅकेट (नदी/पाण वठ्याजवळील भ्रमंती)
गट साहित्य



९३
मल्टीफ्युएल स्टोव्ह, पुरेसे इंधन, स्टोव्ह साहित्य
गट साहित्य



अश्या गिर्यारोहण साधन-सामग्रीची तयार पी.डी.एफ. फाईल डाऊनलोड करून घेण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा. http://www.sahyadri.net/packs--kits.html

नोंद: वरील लेख, 'रॉक क्लाइम्बर्स क्लब' तर्फे विनामुल्य वितरीत केल्या जाणाऱ्या 'सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा' ह्या गिर्यारोहण आणि पर्यटन विषयक ई-मासिकाच्या, ऑक्टोबर २०१२ अंकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

5 comments:

  1. tuza blog wachala ...khup chchaan mahiti dili ahes....ek number....
    fakt ek goshta pramukhyane namud karavishi waatate....paavsalyat kinva itar seasons madhye ghaamamule jhaangrin (jhaanget chalu chalun yenari suuj) cha traas hoto ani baryach lokanna hyachi purva-kaalji kashi ghyaavi hey mahiti naste...ani thodasa ha vishay naajuk aslyamule kadachit haushe-navshe-gavshe trekker mandali hyacha traas houn suddha kalvat naahit ani mag chaaltana tyanchya chaalilvarun andaaj yeto ki hyanna 'jhangrin' (jhanghet zalela gangrene) ch traas hotoy....ashya welela....ek tar UW ghaaluch naye kinva ghaatlich tar mau-talam-suti kapdyaachi ghaalavi...sobatila supporter, langot kinva kalenji chya UW ghalavyat mhanje haa traas udbhavnaar nahi....jodila ekhada vaseline kinva parachute telachi baatli sobat thevavi mhanje traas hoyala laagala tar nidan impacted bhaagala laavlyavar friction kami hoil....janahitarth jaari :)

    ReplyDelete
  2. Jeetendra, really thank you very much for such an imp & useful info.

    ReplyDelete
  3. धन्यवाद.. कधी अचानक गिर्यारोहणाची हुक्की आली की तुमच्या ब्लॉगवर येऊन व्हर्चुअल गिर्यारोहणाचा आनंद लुटतो.. गुगल स्ट्रीट व्ह्यू सारखचं वाटत..!!

    ReplyDelete
  4. धन्यवाद यशोधन..

    ReplyDelete